Pimpri: स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलेल्या पुस्तकाचे भाजपने केले दहन

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण असणाऱ्या पुस्तकाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. त्याचबरोबर या पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या मध्यप्रदेशातील काँग्रेस पक्षाच्या सेवा दलाचाही तीव्र निषेध करण्यात आला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (सोमवारी) झालेल्या आंदोलनात महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रदेश सचिव उमा खापरे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, माजी महापौर आर.एस. कुमार, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, सुरेश भोईर, माऊली थोरात, बांबू नायर, माजी नगरसेवक राजू दुर्गे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, प्रियांका बारसे, शर्मिला बाबर, वैशाली खाडे यांसोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे प्रदीप पाटील, भास्कर रिकामे, संजय मंगोडेकर, योगेश चिंचवडे, नंदू भोगले, अजित कुलथे, कृष्णा भंडलकर, हनुमंत लांडगे, संतोष तापकीर, शितल कुंभार, नंदू कदम, शिवदास हांडे, कैलास सानप, आबा कोळेकर, अदित्य कुलकर्णी, प्रा.दत्तात्रय यादव, द्वारकानाथ कुलकर्णी, वीणा सोनवलकर, कोमल काळभोर, सारिका चव्हाण, प्रतीमा बनसोडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्यात या पुस्तकाच्या प्रदर्शन व विक्रीवर बंदी घालण्यात यावी. अन्यथा या विरोधातील आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा यावेळी शहर भाजपाच्या वतीने देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.