Pimpri: भाजपकडून महासभांचा खेळखंडोबा; तीन वर्षांत तब्बल 53 वेळा सभा तहकूब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘थंपिंग मेजॉरीटी’ असणा-या भाजपने गेल्या तीन वर्षात तब्बल 53 वेळा महासभा तहकूब करून सभा कामकाजाबाबत जराही गांभीर्य नसल्याचे सिद्ध केले आहे. नियमित पक्षबैठक, धोरणात्मक निर्णयावर एकमताचा अभाव, सत्ताधा-यांमधील गटबाजी यामुळे सभा तहकुबींची आफत सत्ताधा-यांवर ओढवत आहे.

महापालिकेत भाजपचे 77 नगरसेवक आहेत. 14 मार्च 2017 रोजी पहिली सभा होवून नवीन सभागृह अस्तित्वात आले. मात्र, सभेच्या कामकाजाबाबत भाजप नगरसेवकांमध्ये उदासिनता आहे. मागील तीन वर्षामध्ये भाजपने सभा तहकुबीचा विक्रम केला आहे. तब्बल 53 वेळा सत्ताधा-यांनी सभा तहकूब केल्या आहेत.

नियमित पक्षबैठक, धोरणात्मक निर्णयावर एकमताचा अभाव, सत्ताधा-यांमधील गटबाजी यामुळे सभा तहकुबींची आफत सत्ताधा-यांवर ओढवत आहे. वादग्रस्त प्रस्तावांवरील चर्चा टाळणे, प्रस्तावांची ‘सेटींग’, पक्षांतर्गत राजकारण, गटबाजी, विरोधी गटाचे प्रस्ताव हाणून पाडणे, प्रशासनावर दबाव आदींसाठी सभा तहकुबीचे राजकारण केले जात आहे.

भाजपच्या सभा तहकुबींच्या ‘तारीख पे तारीख’ धोरणामुळे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव लालफितीत अडकत आहेत. तीन वर्षाच्या काळात भाजपने तब्बल 53 वेळा महासभा तहकूब केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.