Pimpri : पिंपरीगावात वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – पिंपरी गावात दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार आज, बुधवारी (दि. 6) रात्री दीड ते दोनच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून पिंपरी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी गावातील वाघेरे कॉलनी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून त्याद्वारे तपास सुरु केला आहे.

रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या दोन कारची तोडफोड केली आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.