Pune : गोहत्येचे समर्थन करणाऱ्या रावसाहेब दानवे यांची भाजपने हकालपट्टी करावी – मिलिंद एकबोटे

एमपीसी न्यूज- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी गोहत्येचे समर्थन केल्याचा आरोप अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केला आहे. या वक्तव्याचा निषेध करीत एकबोटे यांनी दानवे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी कसायांसोबत झालेल्या बैठकीत गोहत्येचे समर्थन केल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांनी केला.
तसेच मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असे वक्तव्य त्यांनी केल्याचे एकबोटे यांनी म्हटले आहे.

दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांनी माफी मागावी अन्यथा दानवे यांची भाजपने हकालपट्टी करावी अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.