Pimpri News: विविध कार्यक्रमांनी महापालिकेचा 39 वा वर्धापनदिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिनामित्त पहिला स्वातंत्र्य दिन पाहिलेल्या नागरिकांचा सन्मान, महाराष्ट्र शासनाकडील गुणवंत कामगार पुरस्कार, उत्कृष्ट काम करणा-या महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातील 10 सफाई सेवकांचा तसेच उद्यान, अग्निशामक व इतर विभागातील विशेष कामगिरी करणा-या कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. तलावात बुडणा-या मुलांचा जीव वाचवणा-या आयुष तापकीर याचाही सत्कार महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 39 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे शहरातील भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदारांचा सन्मान व गुणवंत कामगारांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.

उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड.नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य शीतल शिंदे, राजेंद्र गावडे, अमित गावडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, आरती चौंधे, सुनिता तापकीर, कमल घोलप, निर्मला कुटे, स्वीकृत नगरसदस्य अॅड.मोरेश्वर शेडगे, सहाय्य्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, ’39 वर्षात शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून मेट्रो सारखे प्रकल्प आज आकारास येत आहेत. शहराच्या विकासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असते. नागरिकांच्या सहकार्यामुळेच आज देशाचे स्वातंत्र्य टिकून आहे. जीवन जगत असताना अनेक संकटे येत असतात परंतु अशा संकटांना आपण तोंड देऊन उभे रहाणे आवश्यक असते.’

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘महानगरपालिकेने लसीकरणावर विशेष दिल्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत आपले शहर लसीकरणात अग्रेसर आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. शहराचा विकास करताना पुढील 40 वर्षांचा शहर विस्तार लक्षात घेवून विकास करण्यात येत आहे. शहर राहण्यायोग्य सर्वोत्तम बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहर स्वच्छतेला महानगरपालिकेचे प्राधान्य असून त्यासाठी अभियान सुरु करणार आहे.’

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ‘आज सन्मानित होणारे जेष्ठ नागरिक हे शहराच्या जडणघडणीचे साक्षीदार आहेत. कोरोना काळामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कामकाज केले त्यांचा गौरव ही महत्त्वाची बाब आहे.’

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘शहराच्या जडणघडणीमध्ये असंख्य नागरिकांचे योगदान आहे. आजचा दिवस भविष्य बघण्याचा आहे. शहराला देशातील पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर बनविण्याचे लक्ष्य आहे यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.’

यावेळी 1947 चा पहिला स्वातंत्र्य दिन पाहिलेल्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विमल जोशी, रघुनाथ भोईर, सदु वाल्हेकर, सुनंदा फडके, लक्ष्मण पेंढारकर, कुमुदिनी पेंढारकर, धरणीधर देव, शकुंतला देव, पुष्पा कोरडे, दत्तात्रय गुपचूप, अनुराधा रुकडीकर, मोरेश्वर गुपचूप, मार्तंड रसाळे, विठ्ठल भोसले, हिराबाई भोसले, दादू कदम, निर्मला अवचट, रमेश खाडे, भास्कर जयवंत, व्यंकटराव तेलंग, भालचंद्र पानसरे, सुमन जमदाडे, मोहिनी व्यास, मालतीबाई कुलकर्णी, पांडुरंग तोरडमल, छाया हर्षे, विनायक जोशी, डॉ. प्रभाकर रेनाटीकर, दिनकर कुलकर्णी, शालिनी कुलकर्णी, मनोहर पासलकर, मेहंदळे, गजानन पोफळे, विष्णुपंत गुजर, विश्वनाथ पेंडसे, सुनिता हरहरे, सुशिला झेंडे, गोविंद देशपांडे, मुकुंद श्रोत्री, बाळकृष्ण नाईक, मंगला खटावकर, मंगला काळे, कृष्णाबाई जाधव, प्रभाकर मोडक यांचा समावेश आहे.

तसेच, विद्या मोडक, कमलाबाई कुलकर्णी, निर्मल पठाण, मालती जोशी, गुणवंत चिखलीकर, विजय पाटील, ग्यानबा गायकवाड, लक्ष्मीपुरी गोसावी, श्रीरंग हाडमोडे, नारायण गराडे, दत्तात्रय कुदळे, नरहरी कुदळे, ज्ञानोबा वाळुंजकर, बाजीराव मांढरे, सखाराम कुदळे, पांडुरंग तोरडमल, नंदराम वाघेरे, चिंतामण सुळे, गोविंद देशपांडे, भानुदास पुराणिक, लक्ष्मण खुपसे, श्यामराव धनोकार, मधुकर पटवर्धन, उत्तम करंडे, हेमराज हालंडे, विष्णुपंत इंगवले, वामन बोरकर, बालाजी पोटगिरे राजाराम सुर्वे, ह.भ.प दिनकर वाल्हेकर, वासुदेव मालतुमकर, शिवनसप्पा धोंडलवार, गुलाबसिंग परदेशी, विठोबा नाणेकर, रामराव झांबरे, मच्छिंद्र साबळे, कांतीलाल मुनोत, प्रल्हाद कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी आदींचा समावेश आहे.

महाराष्ट् शासनाकडील गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कर्मचा-यांचाही यावेळी सत्कार कण्यात आला. यामध्ये विकास कोरे, रवींद्र कुलकर्णी, संजय साळुंखे, सुनील कुटे, किशोरकुमार शिंदे, दत्तात्रय येळवंडे, कृष्णा ढोकले, श्रीकांत भुते, महेश मिस्त्री, हनमंतराव माळी, दत्तात्रय अवसरकर, इस्माईल मुल्लाह, संगीता जोगदंड, शिवराम गवस, शंकर नाणेकर, संदीप पानसरे, श्रीकांत जोगदंड तसेच लक्ष्मण इंगवले, सतीश देशमुख, राजेंद्र हजारे, उद्धव कुंभार, राजेंद्र येलवंडे, शशिकांत इंगळे, सुरेश गावडे, संजय महाजन, राजाराम सावंत, महेश काकडे, प्रकाश पानस्कर, सुनील चौघुले आदींचा समावेश आहे.

उत्कृष्ट काम करणा-या महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातील 10 सफाई सेवकांचा तसेच उद्यान, अग्निशामक व इतर विभागातील विशेष कामगिरी करणा-या कर्मचा-यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तलावात बुडणा-या मुलांचा जीव वाचवणा-या आयुष तापकीर याचाही सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.