Pimpri Corona Update: रुग्णसंख्येत मोठी घट! शहरात आज केवळ 64 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 64 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 463 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 74 हजार 865 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 881 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 517 रुग्ण गृहविलगीकरणात असून 364 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 46 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 378 आहेत. आज दिवसभरात 11 हजार 878 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 20 लाख 97 हजार 128 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.