Pimpri Chinchwad : केबल इंटरनेट प्रकरणातील कंपनी एमएसआरडीसीकडे `ब्लॅकलिस्ट`

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad) केबल इंटरनेटचे जाळे ज्या कंपनीकडे सोपविण्याचे ठरवले होते, त्या मेसर्स सुयोग टेलिमेटिक्स लिमिटेड या कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 23 फेब्रुवारी रोजी तब्बल पाच वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केले आहे.

बँकेत पुरेशी शिल्लक नसतानाही 15 कोटी 77 लाख आणि 4 कोटी 11 लाख असे दोन चेक या कंपनीने महामंडळाला दिले होते, ते वटले नाहीत म्हणून फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. महामंडळाचे कार्यकारी अभियंता सतिशकुमार गावित यांनी माजी नगरसेविका सिमा सावळे यांना या संपूर्ण प्रकरणाची तपशिलवार माहिती एका पत्राद्वारे दिली आहे.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मेसर्स सुयोग टलिमेटिक्स लिमिटेड या कंपनीने महामंडळाला विविध कामांच्या निमित्ताने दिलेले दोन मोठे चेक बाऊन्स झाले आहेत, त्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महामंडळाच्या कोणत्याही परवानगीशिवाय या कंपनीने मुंबईतील माहिम उड्डाण पुलावर परस्पर बीटीएस यंत्रणा बसविली होती.

कंपनीला दिलेले काम नोव्हेंबर 2021 मध्ये संपलेले असताना ही यंत्रणा बसविल्याने हे प्रकरण गंभीर वाटले म्हणून महामंडळाने 21 जानेवारी 2022 रोजी वांद्रे पोलिस स्टेशनकडे तक्रार दाखल केली आहे. महामंडळाने मेसर्स सुयोगचे टेलिमेटिक्स कंपनीचे कारनामे उघडकीस आणल्याने या कंपनीच्या चालकांनी दबाव टाकण्यासाठी थेट केंद्र सरकारकडे खोट्या तक्रारी सुरु केल्या आणि महमंडळाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न (Pimpri Chinchwad) केला. या सर्व प्रकरणांची दखल घेऊन या कंपनीला ब्लॅक लिस्ट केल्याचे पत्रात म्हटले आहे.

Pimple Gurav : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने तरुणाला मारहाण

मात्र अहमदाबाद पोलीसांच्या तपासात सदर कंपनीचे तत्कालिन संचालक हे दुबई आणि पाकिस्तानशी कायम संपर्कात असून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधीत असल्याचे समोर आल्याचे वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. कंपनीची गुन्हेगारी पार्श्वभूमी, खोटी माहिती असे समोर आले असतानाही शहरातील एक बडा नेता आणि महापालिका प्रशासनाचा याच कंपनीला काम देण्याचा आग्रह आजही कायम आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांच्या हातात शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविले तर आगामी काळात खूप मोठा धोका संभवतो, असे आरोप सीमा सावळे यांनी केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.