Fire Mock Drill : वायसीएम रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्थापन पथकातर्फे मॉकड्रिल

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Fire Mock Drill) पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील 502 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आग लागली. आपत्कालीन व्यवस्थापन पथकाने तात्काळ समन्वय साधून सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. सूचना मिळताच सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले गेले. रुग्णालयात लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हा सर्व प्रकार घडला, तो मॉक ड्रीलच्या निमित्ताने! शनिवारी 30 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये संकटकालीन बचाव प्रशिक्षणचे (Fire Mock Drill) आयोजन करण्यात आले. या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांमधील आपत्कालीन समन्वय आणि बचाव करण्याकामी करण्याची कार्यवाही याबद्दल माहिती व्हावी, या उद्देशाने मॉकड्रील यावेळी घेण्यात आले. अग्निशमन दल, पोलीस, सुरक्षा दल तसेच रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी या मॉकड्रीलमध्ये सहभागी झाले होते. अग्निशमन दलाचे 3 बंब, २ फायर फायटर मोटार बाईक, 3 रुग्णवाहिका यांचा वापर या मॉकड्रीलमध्ये करण्यात आला.

रुग्णालयात अचानक आग लागली असता आगीवर नियंत्रण मिळवून त्या आगीपासून रुग्णालयात उपस्थित असलेल्या सर्व रुग्ण, नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ यांच्या जीविताचे संरक्षण करता यावे, याच्या पूर्वतयारीसाठी संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉकड्रिल) महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Fire Mock Drill

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, आपत्कालीन परिस्थितीत इनसिडेंट कमांडर आणि विविध पथक प्रमुख म्हणून काम पाहणारे सहयोगी प्रा. डॉ. मुकेश बावा, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. अतुल देसले, डॉ. महेश असलकर, डॉ. मनजित संत्रे, डॉ. कौस्तुभ कहाणे, डॉ. रितेश पाठक, डॉ, सचिन देवरुखकर, डॉ. पांडुरंग थाटकर, सहायक सुरक्षा अधिकारी संदीप बहिवाल, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आदींसह रुग्णालय सुरक्षितता समिती पथकातील पथक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली गेली.

Dnyaneshwar Serial : वडिलांपाठोपाठ चिमुकल्या विहानचेही मराठी सिनेविश्वात पदार्पण

या फायर मॉकड्रिल दरम्यान वायसीएम रुग्णालयातील सर्व अधिकारी, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांनी त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. तसेच संकटकालीन बचाव प्रशिक्षणसाठी (फायर मॉकड्रिल) संबंधित फायर पंप ऑपरेटर, पाणीपुरवठा मदत विषयक पथक, बायो मेडिकल सपोर्ट पथक, बाह्य अग्निशामक केंद्र पथक, आरोग्य पथक, रक्तपेढी मदत पथक, फायर लायसन्स एजंसी, माहिती व जनसंपर्क पथक, रुग्ण हाताळणी पथक, प्रसारमाध्यम व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका दळणवळण पथक, वैद्यकीय मदत पथक, विद्युत, स्थापत्य, रुग्णालय अंतर्गत अग्निशामक पथक, रुग्ण निर्वासन पथक, तसेच पोलिस मदत पथक (Fire Mock Drill) यांच्यात समन्वय साधून संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉकड्रिल) यशस्वीपणे पार पाडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.