Dnyaneshwar Serial : वडिलांपाठोपाठ तान्हुल्या विहानचेही मराठी सिनेविश्वात पदार्पण

एमपीसी न्यूज – अभिनय क्षेत्रात तरुण वयात किंवा अगदी वृद्धापकाळात करीअरला सुरुवात करणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. पण तीन महिन्याच्या तान्हुल्याने कॅमेरा, रोल, ऍक्शन या तीन शब्दांना प्रतिक्रिया देत अभिनय करणे थोडे दुर्मीळच. हीच संधी तळेगाव दाभाडे येथील तीन महिन्यांच्या विहान (Dnyaneshwar Serial) या चिमुकल्याला चालून आली व त्याने त्या संधीचे सोने केले. त्यामुळे अवघ्या तिसऱ्या महिन्यात विहान मराठी टीव्ही मालिकेत झळकला आहे.

विहान याचे सोनी मराठी चॅनलवरील संत ज्ञानेश्वर या मालिकेतील लहान बाळाच्या एका पात्रासाठी निवड झाली होती. संत गोरोबा कुंभार यांच्या तान्हा श्रीरंग याची भूमिका तो साकरत आहे. सुरुवातीला ज्ञानेश्वर मालिकेमध्ये बाळ म्हणून बाहुलीचा वापर केला जात होता. मात्र, त्यामुळे भूमिकेला मर्यादा येत असल्याने निर्मात्यांनी भूमिकेसाठी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली. आणि विहान त्यांच्या नजरेत भरला. यावेळी त्यांनी सहज विहानच्या आई-बाबांशी बोलणी केली आणि तळेगावचा विहान मराठी मालिकेच्या पडद्यावर झळकला. विहानचे बाबा गणेश टाव्हरे हे सुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनीही छत्रपती संभाजी, फर्जंद, फत्ते शिकस्त अशा चित्रपट व मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत.

या विषयी बोलताना विहानचे बाबा गणेश टव्हारे (Dnyaneshwar Serial) म्हणाले की, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्या प्रमाणे अवघ्या तिसऱ्या महिन्यात त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. असं काही होईल मला स्वप्नातही वाटले नव्हते. कारण त्याचे फोटो सोशल मिडियावर टाकण्यास माझ्या घरच्यांचा पूर्ण विरोध होता.तरीही विहानचा गोड चेहरा पाहून त्याच्या फोटोचे स्टेटस ठेवण्याचा मोह मला आवरता आला नाही व मी ते फोटो ठेवले. हे फोटो संत ज्ञानेश्वर माऊलीचे कास्टींग डायरेक्टर सागर शिंदे यांनी पाहिले व त्यांनी लगेच विहानचे आणखी फोटो मागवून घेतले.

मीराबाईची पुन्हा यशस्वी कामगिरी; राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक

त्यानंतर लागलीच त्यांनी 19 जुलै रोजी आम्हाला बोलावून घेतले. विहान एकाच दिवशी सकाळी दहा ते पाच या कालावधीत काम करत निर्मात्यांना हवे तसे हावभाव देत सर्वांची मने जिंकली. विहान मालिकेच्या भाग क्रमांक 22, 23 व 25 मध्ये श्रीरंग म्हणून झळकणार आहे. वडील म्हणून माझा उर गर्वाने भरून आला आहे. कारण  विहान हा मराठी मालिका क्षेत्रातील सर्वात लहान बालकलाकार ठरला असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तान्हुल्या विहानचे मावळ भागात सर्वत्र कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.