मीराबाईची पुन्हा यशस्वी कामगिरी; राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक

एमपीसी न्यूज : महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने स्नॅच फेरीच्या पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन उचलले तर दुसऱ्या प्रयत्नात 88 किलो वजन उचलून तिने विक्रम केला.

राष्ट्रकुल स्पर्धेत स्नॅचमध्ये एकाही महिला वेटलिफ्टरला 88 किलो वजन उचलता आलेले नाही. यानंतर क्लीन अँड जर्कमध्येही तिने पहिल्याच प्रयत्नात 109 किलो वजनी गटात उर्वरित वेटलिफ्टर्सवर मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात तिने 113 वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. मात्र, तिचा तिसरा प्रयत्न अयशस्वी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात तिला 115 किलो वजन उचलता आले नाही.

मीराबाई चानूने (Mirabai Chanu) राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. याआधी गोल्ड कोस्टवर 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही ती पहिल्या क्रमांकावर होती. त्याचबरोबर चानूने गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्येही रौप्य पदक जिंकले होते.

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा

चानू सतत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत असली तरी एक वेळ अशी आली होती की तिच्या खेळामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चानूला तिची स्पर्धा पूर्ण करता आली नाही. त्यानंतर तिचा खेळच जणू ठप्प झाला होता. महिला वेटलिफ्टिंगमधली चानू ही दुसरी खेळाडू होती, जिच्या नावापुढे ‘डिड नॉट फिनिश’ असे लिहिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.