Sanjay Raut : संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा

एमपीसी न्यूज : मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी (Sanjay Raut) दोनदा समन्स पाठवल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकारी आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी दाखल झाले. दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनाचा दाखला देत त्यांना 27 जुलै रोजी चौकशी समन्स बजावले होते.

मुंबई उपनगरातील चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात केंद्रीय एजन्सीने बुधवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वी, राऊत यांनी 20 जुलै आणि 27 जुलै रोजी संसदेच्या अधिवेशनाचा हवाला देऊन ईडीने समन्स टाळले होते. आता ईडीची टीम थेट त्यांच्या घरी पोहचली आहे.

DHFL Scam : बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त

ईडीच्या समन्सनंतर मी (Sanjay Raut) कोणाला घाबरत नाही असे त्यांनी वक्तव्य केले होते. सोबतच हा दबाव केंद्राकडून होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सर्व घडामोडींचा अंदाज घेता त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय त्यांची बराच वेळ चौकशी देखील होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.