Talegaon-Chakan-Shikrapur : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाला मिळणार मुहूर्त ?

एमपीसी न्यूज : वडगाव-तळेगाव-चाकण-शिक्रापूर या (Talegaon-Chakan-Shikrapur) महामार्गावरील अवजड वाहतून आहोरात्र सुरु असते. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर असल्याचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दावा करतात. प्रत्यक्षात या रस्त्याचे काम सुरु होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. मात्र, आता तळेगाव – चाकण – शिक्रापूर हा 54 किलोमीटर टप्प्यातील राष्ट्रीय महामार्ग भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा होऊन जवळपास पाच वर्षांनी अखेर तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा 54 किलोमीटर टप्प्यातील राष्ट्रीय महामार्ग भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. यासंदर्भातील हस्तांतरण अधिसुचना भारतीय राजपत्राद्वारे 11 जुलैला प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची निविदा प्रक्रिया चालू आहे. त्यानंतर विस्तृत प्रकल्प अहवालाचे काम सुरु होईल आणि रस्ते कामाची निविदा निघेल असे प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात रस्त्याच्या देखभालीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक ए. टी. गोरड यांनी तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा

तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग (Talegaon-Chakan-Shikrapur) सहा पदरी दुमजली पद्धतीने विकसित होणार असल्याची शक्यता लक्षात घेता, भूसंपादन करताना भविष्यातील मेट्रो ट्रेन प्रकल्प देखील विचारात घ्यावा; जेणेकरुन सर्वकाही सुकर होईल, अशी तळेगाव-चाकण महामार्गालगतच्या खराबवाडी, नाणेकरवाडी, म्हाळुंगे, खालुंबरे, येलवाडी, सुदवडी, इंदोरी, माळवाडी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा भूसंपादन करण्याची गरज पडणार नाही. महामार्गालगतच्या गावांचे विकास आराखडे देखील यामुळे सुटसुटीत राहतील. यादृष्टीने संबंधित ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेत ठराव घेण्याची तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.