Pavana Dam : पवना धरण परिसरात पावसाची गेल्या तीन दिवसापासून विश्रांती

एमपीसी न्यूज : पिंपरी – चिंचवड शहरासह मावळ वासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण (Pavana Dam) परिसरात पावसाने गेली तीन दिवस दडी मारली आहे. त्यामुळे धरण परिसरात काहीच पाऊस झाला नाही. गुरुवार पासून शनिवारपर्यंत 0 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे गुरुवारी 81.47 टक्के असलेला पाणीसाठा 0.24 टक्क्यांनी घटून 81.23 टक्के इतका झाला आहे.

तसेच, आज सकाळपर्यंत एकूण 1581 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस 1806 मिमी होता. त्यामुळे 215 मिमी पाऊस यावर्षी आजपर्यंत कमी झाला आहे. तसेच, आजचा पाणीसाठा 81.23 टक्के आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 86.04 टक्के होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 4.81 टक्के कमी आहे.

मीराबाईची पुन्हा यशस्वी कामगिरी; राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक

पिंपरी चिंचवड शहारासह मावळ तालु्क्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण (Pavana Dam) आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहरला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करून शहवासियांना पाणी पुरवठा केला जातो.

पवना धरणातील परिस्थिती – Pavana Dam 

गेल्या 24 तासात झालेला पाऊस : 0 मिमी.
1 जूनपासून झालेला पाऊस : 1581 मिमी.
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस : 1806 मिमी.
धरणातील सध्याचा पाणीसाठा : 81.23 टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा : 86.04 टक्के
गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली घट : 0.22 टक्के
आजची पाण्याची आवक: 0 द. ल. घ. मी
आजपर्यंत पाण्याची आवक: 158.83 द. ल. घ. मी
धरणतील पाण्याचा उपयुक्त पाणीसाठा : 195.78 द. ल. घ. मी
धरणातील पाणी पातळी: 611.15 मीटर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.