Pimpri: शहर शुक्रवारपर्यंत ‘रेडझोन’; रुग्ण वाढीचा दर पाहून पुढील निर्णय – आयुक्त श्रावण हर्डीकर

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) area will be in Red zone till 22nd May, decision will be taken after considering the covid19 patient count in the city

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात दोन दिवसांपासून रुग्ण वाढीचा दर जास्त आहे. परंतु, राज्य सरकारने पुर्वीचा रुग्ण वाढीचा कमी असलेला दर पाहता शहराला ‘नॉन रेडझोन’ म्हटले आहे. दोन दिवसात किती रुग्ण वाढतात. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच शहराला ‘रेडझोन’मधून वगळू नये यासाठी सरकारकडे विनंती करण्याबाबत मी आत्ता काहीच सांगू शकत नाही. रुग्ण वाढीचा वेग पाहून चर्चा केली जाईल. पण, शहर शुक्रवार (दि.22) मध्यरात्रीपर्यंत रेडझोनमध्येच असून जुनेच नियम लागू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या चौथ्या लॉकडाउनमध्ये राज्य सरकारने नवीन नियमावली काढली आहे. त्यामध्ये रेडझोन आणि नॉन रेडझोन असे दोनच झोन निश्चित केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्ण वाढीचा दर जास्त असतानाही शहराला नॉन रेडझोन म्हटले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. रुग्ण वाढत असतानाही शहर नॉन रेडझोन कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील रुग्ण वाढीचा वेग कमी झाला होता.  त्यामुळे ग्रीन झोन न म्हणता पिंपरी-चिंचवड शहराला ‘नॉन रेडझोन’ म्हटले आहे. रेडझोन घोषित केले नाही. दोन दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला ‘नॉन रेडझोन’मधून वगळण्याबाबत चर्चा झाली आहे. शहरात शनिवापर्यंत रुग्ण वाढीचा दर कमी होता.

परिस्थिती नियंत्रणात होती.  पण, शहरात पुन्हा रविवारनंतर रुग्ण संख्येत वाढ सुरु झाली. सरकारने त्यापुर्वीच झोन निश्चित केले होते. आनंदनगर झोपडपट्टीत रुग्ण संख्या वाढत असून आनंदनगर किती लवकर कंन्टेंट करतो. त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल. त्यासाठी दोन दिवस काहीच निर्णय घेतला जाणार नाही. पुर्वीचेच आदेश कायम असतील.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहराला नॉन रेडझोनमधून वगळ्याबाबत सरकारला विनंती करणार का, याबाबत विचारले असता आयुक्त हर्डीकर म्हणाले, अजून आत्ता तसा काही निर्णय घेतला नाही. दोन दिवसात किती रुग्ण वाढतात. त्यावर निर्णय घेतला जाईल. राज्य सरकारला विनंती करण्याबाबत मी आत्ता काहीच सांगू शकत नाही.

चौथ्या लॉकडाउनच्या नवीन नियमावलीची शुक्रवारपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. दोन दिवसात रुग्ण वाढीचा वेग पाहून नियमावली तयार करणार आहोत. सरकारच्या निर्णयाच्या आधारावर नियमावली तयार केली जाणार आहे. कंटेन्मेंट क्षेत्र महापालिकाच ठरविणार आहे. 22 तारखेपर्यंत शहर रेडझोनच आहे. जुनेच नियम चालू राहतील. त्यानंतर वेगळी नियमावली काढली जाईल, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.