Pimpri Chinchwad RTO : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Pimpri Chinchwad RTO) फेब्रुवारी महिन्यात पक्की अनुज्ञप्ती काढण्यासाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी माहिती दिली आहे.

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे 5 व 6 फेब्रुवारी, मंचर येथे 12 व 13 फेब्रुवारी, जुन्नर येथे 21 व 22 फेब्रुवारी, वडगाव मावळ येथे 26 व 27 फेब्रुवारी तर लोणावळा येथे 28 व 29 फेब्रुवारी या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौरा होणार आहे.

Pune : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये 20 जणांची तीन कोटींची फसवणूक, तीन महिलेसह सात जणा विरोधात गुन्हा दाखल

पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 नंतर स्लॉट बुकिंग करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले (Pimpri Chinchwad RTO ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.