Pimpri-chinchwad: सुगरणीच्या विणीच्या हंगामाला सुरुवात

एमपीसी न्यूज: साधारण जुलै महिन्यात सुगरण म्हणजे व्हिवर बर्ड या पक्षाचा विणीचा हंगाम सुरु होतो. (Pimpri Chinchwad) मात्र मागील काही वर्षापासून वाढत्या शहरीकरण व वृक्षतोडीमुळे या पक्षांची घरटी आता दिसेनाशी झाली आहेत.

 

 

पिंपरी-चिंचवड शहराजवळीस चाकण, तळेगाव या परिसरात जिथे तत्सम उंच झाडे आहेत तिथे सुगरणीचे खोपे दिसायला सुरुवात झाली आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत, अर्चना घाळी, संतोष चव्हाण, अमोल कानू ,विशाल शेवाळे, तेजस सापरिया हे सिंधीच्या झाडांचे संवर्धन कसे करता येईल ह्यासाठी ग्रामीण परिसरात अभ्यास करत आहेत.

 

Hinjewadi Murder: खून करून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकला मृतदेह

 

या संदर्भात पर्यावरण अभ्यासक व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटी चे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, साधारण जुलै महिन्याच्या सुरवातीला विणकर किंवा सुगरण पक्षींचा विणीचा हंगाम सुरू होतो. नर पक्षी प्रजनन हेतू मादी आकर्षित करण्यासाठी काटेरी पाने असलेल्या झाडांचा व जिथे अन्नासाठी खाद्य उपलब्ध होईल अश्या उंच ठिकाणांचा शोध घेतात.

 

 

 

चाकणमधील आंबेठाण बिरदवाडी रत्याच्या कडेला बांध्यावर तीन चार शिंदीची झाडे डोलाने उभी आहेत. त्या झाडांवर सुगरण पक्षी खोपा बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. (Pimpri Chinchwad) विणीचा हा काळ साधारण महिनाभर असतो. नंतर ह्यामध्ये मादी प्रजनन हेतु अंडी देते. वाढत्या शहरीकरणामुळे ह्या सुगरण पक्ष्यांसाठी निवारा म्हणून आवश्यक असलेली सिंधींची झाडे मात्र दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे. हे ह्या पक्ष्यांसाठी धोक्याची घंटा आहे. असच म्हणाव लागेल.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.