Hinjewadi Murder: खून करून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकला मृतदेह

हिंजवडी माण परिसरातील घटना

एमपीसी न्यूज : हिंजवडी परिसरातील एका रोडच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एका व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला होता. (Hinjewadi Murder) ही घटना शुक्रवारी (दि.15) रात्री साडे सातच्या सुमारास उघडकीस आली. हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञाता आरोपी विरोधात शनिवारी (दि.16) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune Auto Driver: कारला रिक्षाने धडक दिल्यानंतर कारचालकालाच बेदम मारहाण, डोक्यात फोडली बाटली

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नागरिकांनी शुक्रवारी हिंजवडी येथील  माणकडून म्हाळुंगे गावाडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कचऱ्यात मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले.  (Hinjewadi Murder) पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता अहवालात अज्ञात हत्याराने जबर जखमी करण्यात आल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.