Pune Auto Driver: कारला रिक्षाने धडक दिल्यानंतर कारचालकालाच बेदम मारहाण, डोक्यात फोडली बाटली

रिक्षाचालकाची मुजोरी

एमपीसी न्यूज: सैराट चित्रपटातील अभिनेता सल्या म्हणजेच अरबाज शेख यांना पुण्यातील रिक्षा चालकाचा वाईट अनुभव आला होता. याबाबत त्यांनी फेसबुक वर एक पोस्ट लिहून आपला अनुभव माडला होता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील रिक्षा चालकांची मुजोरी समोर आली होती. (Pune Auto Driver) पुण्यातील कोंढवा परिसरात देखील असाच काहीसा प्रकार घडला. एका रिक्षा चालकाने आधी कारला धडक दिली आणि त्यानंतर कारचालकासोबत हुजत घालत त्याला मारहाण केली. 11 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. 

 Pavana Dam: पवाना धरण पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गंगाधाम चौक ते लुल्ला नगर या रस्त्यावर हा प्रकार घडला. फिर्यादी तरुण हर्षल राठोड हा आई आणि भावासह कार मधून गंगाधाम चौकाकडे जात होते. यावेळी त्यांच्या कारला एका रिक्षा चालकाने धडक दिली. (Pune Auto Driver) यावरून दोघात वाद झाला आणि त्यानंतर ऑटो रिक्षा चालकांनी बिअरची बाटली उचलली आणि हर्षल राठोड यांच्या चेहऱ्यावर मारली. नंतर कारची देखील त्याने तोडफोड केली. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.