Pavana Dam: पवना धरण पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ

पाणीसाठा 63 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज: मावळ परिसरात पावसाने तुर्तास विश्रांती घेतली असली तरी पवना धरणात मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. (Pavana Dam) जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी जुलै महिन्यात अवघ्या आठ दिवसात पावसाने पूर्ण कसर भरून काढली आहे. त्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा हा 62.91 म्हणजे 63 टक्क्यांवर पोहचला आहे. मागीलवर्षी आजच्या दिवशी 35.59 टक्के एवढे पाणी होते.

 

 

मागील 24 तासात धरण परिसरात 50 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाचा जोर थोडा ओसरल्याने धरणातील येवा कमी झाला आहे. (Pavana Dam) त्यामुळे शंभर टक्के धरण भरण्यासाठी नागरिकांना थोडी वाट बघावी लागणार आहे. तुर्तास धरणातील विसर्गही थांबवण्यात आला आहे. 1 जुनपासून आज पर्यंत घरण क्षेत्रातून 28.57 घन मिली मीटर इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

 

Khadki Terminal: खडकी स्टेशन होणार स्वतंत्र टर्मिनल, पुणे रेल्वे स्टेशनचा भार होणार हलका

 

सध्या पवना धरणातील परिस्थिती!

गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 50 मि.मि.

1 जूनपासून झालेला पाऊस = 1, 373 मि.मि.

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 604 मि.मि.

धरणातील सध्याचा पाणीसाठा = 62.91 टक्के”

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 35.29 टक्के

गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ

= 3.5 टक्के

1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 46.07 टक्के*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.