Pimpri Chinchwad : जी- 20 परिषदेच्या बैठकांमुळे 14 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : जी- 20 परिषदेच्या बैठकांमुळे पुणे व पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरांमध्ये 14 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 14 ते 18 जानेवारी दरम्यान सर्व मान्यवर, महत्त्वाच्या व्यक्ती यांच्या वाहनांची ये-जा मुख्यत्वे करून पुणे विद्यापीठ या परिसरातून होणार असून पुणे विद्यापीठ परिसरातील सर्व रस्ते मार्ग वाहतुकीसाठी मोकळे असणे आवश्यक आहे. पुणे विद्यापीठ चौकात राजीव गांधी पुल, औंध तसेच मुंबई बेंगलोर महामार्ग एन एच 48 यावरील राधा चौक तसेच बालेवाडी, सुस रोड, पाषाण मार्गे मोठ्या प्रमाणात जड वाहतूक येत असते. त्यामुळे येथील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत.

त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांना अडथळा होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व मान्यवरांच्या हालचाली सुस्थितीत व विना अडथळा होण्यासाठी पुणे शहर पोलीस अंतर्गत पुणे विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या जड वाहतुकीस 14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Lonavala : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

बावधन, हिंजवडी, वाकड, देहूरोड, सांगवी वाहतूक विभाग अंतर्गत वाहतुकीत बदल – Pimpri Chinchwad

1) चांदणी चौक पाषाण मार्गे पुणे विद्यापीठाकडे येण्यास जड, अवजड वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग : अ) जुना मुंबई- पुणे महामार्गावरील सेंट्रल चौकातून निगडी भक्ती शक्ती- खडकी मार्गे पुण्याकडे जातील.
ब) पुणे बेंगलोर हायवे कात्रज मार्गे इच्छितस्थळे जातील.

2) सुस रोड, पाषाण मार्गे पुणे विद्यापीठाकडे येण्यास जड, अवजड वाहनांना प्रवेश बंद
पर्यायी मार्ग : अ) जुना मुंबई- पुणे महामार्गावरील सेंट्रल चौकातून निगडी भक्ती शक्ती चौक – खडकी मार्गे पुण्याकडे जातील.
ब) पुणे बेंगलोर हायवे कात्रज मार्गे इच्छित स्थळी जातील.

3) मुंबई बेंगलोर हायवेवरील राधा चौक बालेवाडी, बाणेर मार्गे पुणे विद्यापीठाकडे येण्यास जड अवजड वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग: अ) जुना मुंबई पुणे महामार्गावरील सेंट्रल चौकातून निगडी भक्ती शक्ती खडकी मार्गे पुण्याकडे जातील.
ब) पुणे बेंगलोर हायवे कात्रज मार्गे इच्छित स्थळी जातील.

4) वाकड तळवडे रावेत कडून राजीव गांधी पुल, औंध मार्गे पुणे विद्यापीठाकडे येण्यास जड अवजड वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग: अ) जुना मुंबई पुणे महामार्गावरील सेंट्रल चौकातून निगडी भक्ती शक्ती खडकी मार्गे पुण्याकडे जातील.
ब) पुणे बेंगलोर हायवे कात्रज मार्गे इच्छित स्थळी जातील.

हे वाहतुकीचे बदल 14 जानेवारी मध्यरात्रीपासून ते 18 जानेवारी पर्यंत लागू असणार आहेत. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवडचे वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत. नागरिकांनी वरील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक विभागाने दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.