Pimpri: शहर विकासकामांना येणार वेग; विधानसभा आचारसंहितेची धास्ती

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी (दि. 27) शिथिल होण्याची शक्यता असून त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांना वेग येऊ शकतो. मंजुरी दिलेल्या कामांना कार्यरंभ आदेश दिले जातील. तसेच नवीन कामाच्या निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात येईल. तीन महिन्यावर विधानसभेची निवडणूक आली आहे. त्यामुळे विधानसभेच्या आचारसंहितेची देखील धास्ती असून त्यामुळे विकासकामांना गती दिली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 10 मार्च रोजी लागू झाली होती. तब्बल 80 दिवस म्हणजेच तीन महिने आचारसंहिता होती. आचारसंहितेत कोणतीही विकासकामे करत नाहीत. त्यामुळे विकासकामांना तीन महिने खिळ बसली होती. लोकसभेची आचारसंहिता शिथिल केल्यानंतर विकासकामांबाबत निर्णय घेता येतील. त्यामुळे विकास कामांना वेग येऊ जाऊ शकतो. तीन महिन्यांनावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे तीन महिन्यांनी लगेच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेची आचारसंहिता ऑगस्ट महिन्यात लागू शकते. त्यासाठी विकासकामांना वेग येऊ शकतो.

  • आचारसंहिता असल्याने नवीन विकासकामे पूर्णत: ठप्प झाली होती. नवीन निविदा प्रक्रिया राबविणे, कार्यारंभ आदेश देण्यास प्रतिबंध होता. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर महापालिका ही कामे हाती घेईल. आचारसंहितेमुळे 428 कोटी 70 लाख रुपये रकमेच्या 103 निविदांच्या कामाबाबत आदेश देणे रखडले होते. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर त्याला कार्यरंभ आदेश दिला जाऊ शकतो. नवीन निविदा प्रक्रिया राबविली जाईल.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विकासकामांना गती दिली जाऊ शकते. मतदारांना प्रभावी करण्यासाठी विविध प्रकल्प राबविली जाऊ शकतात. पंतप्रधान आवास योजनेच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवाती केली जाऊ शकते. बोपखेलवासियांसाठी मुळा नदीवर बांधण्यात येणा-या पुलासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.