Pimpri Corona news: ऑक्सिजन वितरण, व्यवस्थापनावर देखरेखीसाठी वॉर रुममध्ये 24 तास नियंत्रण कक्ष

एमपीसी न्यूज – ऑक्सिजन पुरवठ्याचे वितरण, व्यवस्थापन यावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका मुख्यालयातील वॉर रुममध्ये 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचे वितरण , व्यवस्थापन यावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका मुख्यालयातील वॉर रुममध्ये 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, कुंडलिक आमले, फिजीओथेरेपिस्ट कौस्तुभ लसुंते, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जुवंटवार, कनिष्ठ अभियंता मोहन कोरे, प्रशांत कोतकर, बाळासाहेब शेट्टे, सुनिल पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

ऑक्सिजन पुरवठ्याचे वितरण , व्यवस्थापन, देखरेख, संचलन व जलद आणि कर्यक्षमरित्या समस्यांचे निराकरण करणे, शहरातील छोट्या रुग्णालयांच्या ऑक्सिजन सिलेंडर संदर्भातील तक्रारींची नोंद करणे, सिलंडरचे वितरण आणि व्यवस्थापन करणे आदींची माहिती नियंत्रण कक्षामार्फत केली जाणार आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात येणा-या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, देवन्ना गट्टूवार यांची विभागीय आयुक्त कार्यालयात नेमणूक करण्यात आली आहे. हे कार्यकारी अभियंता रात्रीच्या वेळी विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत राहतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.