Chakan Crime News : स्फोटके आणि इलेक्ट्रिक डिटोनेटरची वाहतूक करणारा अटकेत 

एमपीसी न्यूज – चारचाकी वाहनातून स्फोटके आणि इलेक्ट्रिक डिटोनेटरची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलं आहे. गुरुवारी (दि. 22) तळेगाव चौक, चाकण येथे रात्री सातच्या सुमारास हि कारवाई केली. 

 

राजाराम विष्णू मोरे (वय 45, रा. काळुस, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनिल बबन मोरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एम एच 14 / ईसी 8045 या चारचाकी वाहनातून एक्सपोसिव्ह स्फोटके (600 तोटे) आणि डेटोनेटर (300) असा मुद्देमाल विनापरवाना वाहतूक करत होता.‌ आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवडे करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.