Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 157 नवीन रुग्ण; एकूण संख्या 2 हजार 722

Pimpri Corona Update: 157 new patients in Pimpri-Chinchwad on Sunday; Total number 2722 आज पॉझिटिव्ह आलेल्या 157 रुग्णांमध्ये 81 पुरुष आणि 76 महिला रुग्णांचा समावेश आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 28) 157 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 2 हजार 722 झाली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 115 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 1 हजार 35 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 157 रुग्णांमध्ये 81 पुरुष आणि 76 महिला रुग्णांचा समावेश आहे.

रविवारी 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 1 हजार 640 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

विशालनगर, पिंपरी येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. आजवर शहरात 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या 63 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 164 रुग्णांना आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 3 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी 24 हजार 538 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भेट दिली. त्यातील 73 हजार 225 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात 366 नागरिकांचे अलगीकरण करण्यात आले आहे.

रविवारी खालील भागातील कोरोनाचे रुग्ण सापडले

केशवनगर कासारवाडी, पिंपळे सौदागर, विकासनगर देहूरोड, गवळीनगर भोसरी, गणेशनगर डांगे चौक, आदर्शनगर पिंपरी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, आकुर्डी, नेहरुनगर पिंपरी, लांडेवाडी भोसरी, विठ्ठलनगर पिंपरी, दळवीनगर, महात्मा फुलेनगर भोसरी, काशिद पार्क पिंपळे गुरव, डिलक्स चौक पिंपरी, शगुन चौक पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी, रिव्हर रोड पिंपरी, कुदळे चाळ पिंपरी, नव महाराष्ट्र विद्यालय पिंपरी.

बौध्दविहार पिंपरी, मिलिंद नगर पिंपरी, कैलासनगर थेरगाव, महाराष्ट्र कॉलनी पिंपळे गुरव, मंगलनगर वाकड, भाटनगर पिंपरी, सुभाष नगर पिंपरी, वालकन सोसायटी पिंपळे निलख, गुलाबनगर पिंपरी, तानाजीनगर चिंचवर, विजय अपार्टमेंट पिंपरीगाव, गणेशनगर भोसरी, पाटीलनगर चिखली, दिघीरोड भोसरी, वैभवनगर पिंपरी.

तापकीरनगर काळेवाडी, रंजक कॉलनी, इंद्रायणी नगर भोसरी, गणेशनगर दिघी, रुपीनगर निगडी बापुजी बुवा मंदिर पिंपळे गुरव, इंदिरानगर चिंचवड स्टेशन, आदर्श नगर काळेवाडी, भारत माता नगर दिघी, इंदिरानगर चिंचवड, संभाजीनगर, यमुनानगर निगडी, जयगणेश साम्राज्य भोसरी, सुदर्शन नगर चिखली, भारत माता हाऊसिंग सोसायटी वाल्हेकरवाडी.

चिखली, शाहूनगर चिंचवड, पटेलगार्डन जुनी सांगवी, किर्ती हॉस्पिटल जबळ पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, कोकणेनगर काळेवाडी, वाकड, शिवाजीवाडी मोशी, कुदळे चाळ पिंपरी, रमाबाई नगर पिंपरी, चिंचवड स्टेशन, काळभोर नगर चिंचवड, शाखीनगर पिंपरी, दापोडी, वसंतदादा पाटील नेहरुनगर, वाल्हेकरवाडी.

नढेनगर, काळेवाडी, नंदनवन कॉलनी भोसरी, नम्रता कॉलनी थेरगाव, जवळकर चाळ कासारवाडी, हिराबाई झोपडपट्टी कासारवाडी, चिकन चौक निगडी बौद्ध नगर, आनंद विहार रावेत, हडपसर, मंगळवार पेठ, चाकण, कोंढवा, जुन्नर

रविवारी खालील भागातील रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला

जुनी सांगवी, संजय गांधी नगर, रिव्हर रोड पिंपरी, गोविंद गार्डन, जय हिंद स्कुल पिंपरी, चिंचवड स्टेशन, यमुनानगर, नढेनगर, गवळीनगर भोसरी, आनंदनगर चिंचवड, संत तुकाराम नगर पिंपरी, नाणेकर चाळ पिंपरी, जगताप डेअरी पिपळे निलख, विशालनगर पिंपळे निलख.

पंचतारा नगर आकुर्डी, भगवतगीता नगर खरळवाडी, एक्सईड बॅटरी चिंचवड, सिध्दार्थनगर दापोडी, साईबाबानगर चिंचवड, अंजठानगर, वैष्णदेवी मंदिर पिंपरी, खंडोबा माळ भोसरी, वैदूवस्ती पिंपळे गुरव, संत तुकारामनगर भोसरी, शाहुनगर, प्रियदर्शनीनगर सांगवी, नढेनगर काळेवाडी, निगडी.

तापकीरनगर काळेवाडी, बौध्दनगर पिंपरी, सायली कॉम्प्लेक्स वाल्हेकरवाडी, वडमुखवाडी आळंदीरोड, कुदळवाडी चिखली, नेवाळेवस्ती चिखली, पंचतारा नगर आकुर्डी, मोरया नगर चिंचवड गाव, रुपीनगर तळवडे, महात्मा फुलेनगर दापोडी, तापकीर नगर मोशी.

महात्मा फुले सोसायटी निगडी, साईबाबनगर चिंचवड, विद्यानिकेतन स्कुल निगडी, बौध्दनगर पिंपरी, समर्थनगर नवी सांगवी, सोनगिरा अपार्टमेंट चिंचवड, सिंधुनगर निगडी, खराळवाडी, किवळे, पिंपळे गुरव, स्रेहा कॉलनी म्हाडानगर काळेवाडी, भारत नगर पिंपरी.

दत्त मंदिर वाकड, कन्हैया पार्क थेरगाव, प्राधिकरण निगडी. लोंठेचाळ पिंपरीगाव, चिखली, विठ्ठलनगर नेहरुनगर पिंपरी, गणेशनगर पिंपरी, हाऊस गल्ली भोसरी, कासरवाडी, सिध्दार्थनगर, वसंतनगर काळेवाडी, गांधीनगर येरवडा, आदर्शनगर देहुरोड, महात्मा गांधीनगर येरवडा, देहूरोड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.