Pimpri Corona Update : रविवारी शहरात 185 नवीन रुग्ण; 718 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 13) दिवसभरात 185 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 718 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 3 लाख 57 हजार 114 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 50 हजार 674 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 2 हजार 563 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 2 हजार 412 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 151 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 7 हजार 750 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 33 लाख 58 हजार 707 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.