Pimpri Corona Update : शहरात आज 235 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 220 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 220 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 235 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 4 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 5 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 249 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 55 हजार 130 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 176 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 249 रुग्ण गृहविलगीकरणात असून 927 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 32 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 414 आहेत. आज दिवसभरात 4 हजार 117 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 43 हजार 205 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.