_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri Corona Update : शहरात आज 339 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 244 नवीन रुग्णांची नोंद

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 244 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 339 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 10 आणि महापालिका हद्दीबाहेरील 7 अशा 17 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 203 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 53 हजार 222 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सध्या 2 हजार 840 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 195 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 645 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 94 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 699 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 811 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 21 हजार 863 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment