Pimpri Corona Update : शहरात रुग्ण वाढीला थोडासा ब्रेक; आज 554 रुग्णांची नोंद, 959 जणांना डिस्चार्ज, 15 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण वाढीला आज थोडासा ब्रेक लागला आहे. गेल्या अनेक दिवसांनंतर शहरातील रुग्णसंख्या एक हजाराच्या आतमध्ये आली आहे. शहराच्या विविध भागातील 554 नवीन रुग्णांची आज नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 76 हजार 633 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 959 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 10 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 15 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात काळभोरनगर, निगडी, चिखली, सांगवी, चिंचवड, वाकड, पुनावळे, देहूगाव, मुळशी, आंबेगाव, लोणावळा, चाकण येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 76 हजार 633 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 63 हजार 580 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1290 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 479 अशा 1769 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 4676 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.