Pimpri Corona Update : दिलासादायक ! नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त; शहरात आज 1805 नवीन रुग्णांची नोंद, 2408 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहराच्या विविध भागातील 1 हजार 805 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर, 2 हजार 408 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 63 जणांचा मृत्यू झाला.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2 हजार 408 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 40 आणि महापालिका हद्दीबाहेरील 23 अशा 63 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 43 पुरुष आणि 20 महिला रुग्णांचा समावेश आहे. मागील काही दिवसानंतर मृत्यूचे प्रमाण आज कमी झाले आहे.

शहरात आजपर्यंत 2 लाख 19 हजार 300 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 95 हजार 192 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 3132 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1580 अशा 4 हजार 712 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 7 हजार 968 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2294 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 4 लाख 4 हजार 54 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.