Pimpri corona Update : कोरोनाचा उद्रेक ! शहरात आज 2 हजार 938 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2904 आणि महापालिका हद्दीबाहेरील 34 अशा 2 हजार 938 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1679 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 15 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 17 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 10 पुरुष आणि 7 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 55 हजार 984 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 30 हजार 129 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2094 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 850 अशा 2944 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3969 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, 1752 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 2 लाख 8795 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 15 हजार 415 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.