Pimpri Corona Update :  शहरात दिवसभरात 77 जणांना डिस्चार्ज; नवीन 102 रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोनाचे 754 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज (रविवारी, दि. 20) पिंपरी-चिंचवड शहरात 102 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 95 हजार 333 एवढी झाली आहे. तर आजवर 91 हजार 856 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण चिखली (53वर्ष) येथील आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 735 तर शहराच्या बाहेरील 713 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 754 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 988 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 119 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 2 हजार 131 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.