Pimpri Corona Update : गुड न्यूज ! आज 5374 जण कोरोनामुक्त, 641 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 641 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 5 हजार 374 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 28 आणि महापालिका हद्दीबाहेरील 14, अशा 42 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 862 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 46 हजार 54 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 7 हजार 800 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 3 हजार 352 रुग्ण गृहविलगीकरणात असून 4 हजार 448 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 217 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 593 आहेत. आज दिवसभरात फक्त 1 हजार 263 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 4 लाख 73 हजार 385 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.