Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवड शहरात एक हजार 77 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, 17 रुग्णांचा मृत्यू

रविवारी 601 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 33 हजार 873 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील आज (दि.30) एक हजार 77 रुग्णांचे तर शहराबाहेरील 59 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 47 हजार 737 झाली आहे. दिवसभरात महापालिका हद्दीतील 14 आणि हद्दीच्या बाहेरील 3 अशा एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 601 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 6 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रविवारी 601 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 33 हजार 873 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

रविवारी शहरातील 14 रुग्णांचा तर शहराच्या बाहेरील 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज मृत झालेले रुग्ण देहुरोड (स्त्री 68 वर्ष), भोसरी (पुरुष 65 वर्षे, पुरुष 65 वर्षे, पुरुष 76 वर्षे, पुरुष 79 वर्षे,), सांगवी (पुरुष 76), नेहरुनगर (पुरुष 43 वर्ष), पिंपरी (पुरुष 39, पुरुष 29), वाकड (पुरुष 76), मोशी (पुरुष 64 वर्षे, पुरुष 74 वर्षे), बिजलीनगर (स्त्री 46 वर्षे), आळंदीरोड (स्त्री 62 वर्ष) आंबेगाव (पुरुष 65 वर्षे पुरुष 65 वर्ष), खेड (पुरुष 65 वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील 59 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 925 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक हजार 840 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 314 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.