Pimpri Corona Update : शहरात आज 423 नवीन रुग्णांची नोंद, 626 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत आहे. शहराच्या विविध भागातील 423 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 626 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 24 आणि महापालिका हद्दीबाहेरील 15 अशा 39 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 916 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 47 हजार 132 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 6 हजार 239 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 2 हजार 216 रुग्ण गृहविलगीकरणात असून 4 हजार 23 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 182 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 594 आहेत. आज दिवसभरात फक्त 2 हजार 81 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 4 लाख 79 हजार 470 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.