Pune News : पुणे महापालिकेच्या स्वॅब सेंटर्सवर फ्री मेडिकल चेकअप

एमपीसी न्यूज – महापालिका, शहरातील होम हेल्थ केअर कंपनी हिलयोस आणि संचेती रुग्णालय यांनी एक करार केला आहे. त्यानुसार स्वॅब सेंटर्सवरच फ्री मेडिकल चेकअप केले जाणार असून आणि रुग्णांना आवश्यक तो सल्ला दिला जाईल. यामुळे सर्व कोरोना रुग्णांची काळजी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदतीचा हात मिळणार आहे.

हिलयोस आणि संचेती हॉस्पिटल स्वॅब टेस्टिंग सेंटरमध्ये कोविड-19 केअर क्लिनिक उभारत आहेत. महापालिकेमार्फत जे स्वॅब सेंटर्स चालवले जात आहेत त्यांना बेसिक मेडिसीन किटसह फ्री मेडिकल चेकअपही दिलं जाणार आहे.

डॉक्टरांमार्फत बेसिक तपासणी झाल्यानंतर त्यांनी घरी क्वारांटाइन व्हावं की रुग्णालयात दाखल व्हावं, याबाबत सल्ला दिला जाईल. जर रुग्णाला कोणतीही गंभीर लक्षणं नसतील आणि ते होम आयसोलेट होऊ शकत असतील तर हिलयाॅस आणि संचेती हॉस्पिटलमार्फत त्यांना मोफत बेसिक मेडिकल टूल किट दिलं जाणार आहे.

पालिकेमार्फत जवळपास 21 स्वॅब टेस्ट सेंटर चालवले जात आहेत. अशा पद्धतीचं कोविड-19 केअर क्लिनिक येरवडा स्वॅब टेस्ट सेंटरमध्ये सुरू होईल आणि हळूहळू इतर सेंटर्समध्येही सुरू केलं जाईल. या करारामुळे लोकांना सहजपणे आणि तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात मदत होत असल्याने खूप आनंद वाटतो आहे, असं महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.