Pimpri corona Update : शहरात 173 नवीन रुग्ण, 121 जण कोरोनामुक्त, 4 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 161 आणि पालिका हद्दीबाहेरील 12 अशा 173 नवीन कोरोना रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची कोरोना रुग्णसंख्या 87 हजार 594 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 4 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात कासारवाडीतील 78 वर्षीय पुरुष, धानोरीतील 40 वर्षीय पुरुष, आंबेगाव येथील 57 वर्षीय पुरुष, पेरणे फाटा येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 87 हजार 594 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 84 हजार 246 जण बरे होऊन घरी गेले. शहरातील 1527 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 630 अशा 2157 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 947 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1138 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.