Pimpri : पूरग्रस्तांच्या मदतीला धावले नगरसेवक अन् युवा कार्यकर्ते

एमपीसी न्यूज – शहरात सध्या उदभवलेल्या सामान्य नागरिकांचे भीतेच वातावरण असून आबालवृध्द धास्तावलेल्या स्थितीत आहेत. अशा या संकटकाळी त्या – त्या भागातील नगरसेवकांनी पूरग्रस्तांच्या मदतीला भावनिक साद देऊन संकटकाळी धावले.

रविवारचा संपूर्ण दिवस पूरस्थिती भागातील आढावा नगरसेवक घेत होते. त्यात नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक चंद्रकांत नखाते, निर्मला कुटे यांनी स्वत जातीने लक्ष घालून पूरबाधितांना सुरक्षित स्तळी हलविले. तसेच वैद्यकीय सेवासंदर्भात महापालिका प्रशासनाला उपाययोजना राबविण्यासंदर्भात सातत्याने सूचना देण्यात येत होत्या. यावेळी प्रशासकीय विभागाचे अधिकारी व परिसरातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • रहाटणीतील पवना नगर आणि गंगानगर भागातील वस्त्यांमधीसल घरात मोठया प्रमाणात पाणी शिरल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लहान मुले आणि वृध्द नागरिक बावरलेल्या स्थितीत आहेत. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेक नागरिकांचा संसार अक्षरश उघड्यावर पडला आहे.

पवना नदीला पुर आल्यामुळे रहाटणीमधील पवना नगर व गंगानगगर मध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे सुरक्षित स्थळी(राहटणीच्या शाळे)मध्ये स्थलांतर केले व त्येंच्या जेवणाची ,राहण्याची,वैद्यकीय वेवस्था पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली या वेळी नगरसेविका निर्मला कुटे, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, युवा नेते शुभम नखाते नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन सहायक आयुक्त स्मिता झगडे आदी उपस्थित होते.

  • तसेच कासारवाडी दापोडी याठिकाणी नदीपात्रातील पाणी वाढल्यामुळे घटनास्थळी राष्ठ्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते शेखऱ ओव्हाळ यांनी पूरपरिस्थीतीची पाहणी केली. धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कासारवाडी दापोडीचा नदी किनारा जलमय झाला. तसेच शेखर युवा मंचच्यावतीने पिंपरी भाटनगर येथे अन्नदान तर दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी येथील ठाकरे शाळेतील पूरग्रस्तांना ब्लॅकेंटचे वाटप केले. ठिकठिकाणी चेंबर तुंब्याने घरांमधून पुराच्या पाण्यासोबत मैलामिश्रित पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत.

पूरग्रस्त नागरिकांना महापालिकेने तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणीही शेखर ओव्हाळ यांनी केली. संभाव्य धोका माहित असूनही मुळा व पवनानदी किनारा रहिवाशी भागात प्रशासनाने यंत्रणा अद्ययावत ठेवणे आवश्यक होते. महापालिका यंत्रनेने पावसाळा सुरु होण्याच्या आधी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती कारवाई करणे अपेक्षित होते.

  • पिंपरी येथील संजय गांधी नगर,आंबेडकर नगर, बौध्द नगर व सुभाष नगर येथील व दापोडी येथील वस्ती मधे नदी पत्रामधील पाणी घराघरामध्ये घुसले पूरस्थिती निर्माण झाली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आवश्यकता असल्यासच नागरिकांनी बाहेर पडावे असे आव्हान राजेश आण्णा पिल्ले यांनी घटणास्थळी जाऊन केले तसेच अनेक नागरिकांना जवळच्या शाळेमध्ये सोयकरून स्थलांतरीत केले आणि दिवसभर अडकलेल्या नागरिकांना चहा पाणी, आणि जेवणाची सोय विविध भागामध्ये केली तसेच वेळोवेळी आवश्यकतेनुसार लागेल ती मदत करू असे घोषित केले.

पवना धरणातून आत्तापर्यंत 10 हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. दुपारी बारा वाजल्यानंतर हा विसर्ग 18 हजार क्यूसेस वेगाने करण्यात आला आहे. धरणातून सोडलेले पाणी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले यावेळी राजेश आण्णा पिल्ले व क स्वीकृत सदस्या वैशाली खाडये तसेच राजेश आण्णा पिल्ले आदी उपस्थित होते.

  • पावसामुळे प्रभावित झालेले तसेच नदी पात्रातील पाणी रहिवासी भागात शिरल्यामुळे जवळपास २०० कुटुंबांची तात्पुरती राहण्याची आणि अनुषंगाने त्यांच्या जेवणाची सोय रहाटणी येथील पीसीएमसी शाळेमध्ये सोमवारपासून करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते यांनी या कुटुंबांची भेट घेतली व त्यांच्यासाठी सकाळी खिचडी व संध्याकाळी फराळाची व्यवस्था आमदार लक्ष्मण जगताप व संदीप नखाते यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी भगवान नखाते, किरण केसवड, सचिन तुपे, प्रशांत जगताप, योगेश आवटे, योगेश सदानंदे व वस्ताद ग्रुपच्या वतीने लहान मोठ्यांना भेट देऊन यावेळी त्यांनी धीर दिला.

वाकड कस्पटेवस्ती मधील मानकर चौक ते कस्पटेचौका दरम्यानच्या निसर्गपुजा सोसायटी,व्हीसलींग पाल्म, पद्मावती धारा, ठक्कर व्हिला सोसायटी व कैसकेड सोसायट्यांमधे पुलाचे पाणी छातीच्यावर शिरल्यामुळे रहिवाशांना जीवनावश्यक वस्तु पोहोचवण्यात आल्या. ३०-३५ महिला व मुले यांना बोटीतुन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्थलांतरीत केले आहे. तसेच जनरेटर व्हॅन निसर्गपुजा आणि व्हीसलींग पामस सोसायटीमधे पोहोचवली आहे. पूरग्रस्त सोसायटीधारकांना जीवनावश्यक वस्तु पोहोचवण्याचे काम स्वतः नगरसेवक संदीप कस्पटे व सर्व सहकारी गेली दोन दिवस रात्रीपासून सुरु आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.