Pimpri Crime News : हॉटेलमधील कामगाराची हॉटेलमध्येच आत्महत्या

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली.

शब्बी उल शेख (वय 25, सध्या रा. तिरंगा हॉटेल, पिंपरी. मूळ रा. पश्‍चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शब्बी उल शेख हा पिंपरीतील एका हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याचा बहुतांश वेळ हा फोनवर बोलण्यात जात असे. सोमवारी सकाळी त्याने टॉवेलच्या साहाय्याने हॉटेलमधील शिडीला गळफास घेतल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शब्बी उल शेख याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.