Pimpri crime News : समाजकंटकांनी लावलेल्या आगीत सात दुकाने जळून खाक

एमपीसी न्यूज – समाजकंटकांनी जाणीवपूर्वक लावलेल्या आगीत सात दुकाने जळून खाक झाली. आगीची ही घटना मंगळवारी (दि. 29) पहाटे एक ते दोन वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केट, पिंपरी येथे घडली.

याबाबत प्रवीण कांबळे यांनी माहिती दिली. काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केट येथील गाळ्यांना ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. त्यामध्ये सात गाळे जळून खाक झाले आहेत. यामध्ये व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याच भागात बुद्ध विहार आहे. त्यातून प्रवचन, व्यसन मुक्ती केंद्र, कायदा सल्ला केंद्र आणि अन्य अनेक सामाजिक उपक्रम चालवले जातात. काही लोकांनी विहाराजवळ पत्र्याचे बेकायदेशीर शेड उभारले होते. पालिकेने ते शेड पाडले. त्याच रागातून त्या समाजकंटकांनी आग लावली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

याबाबत अग्निशमन विभाग, पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही कांबळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.