Pimpri : शॉर्टसर्किट झाल्याने डीपी बॉक्‍सला आग

एमपीसी न्यूज – शॉर्टसर्किटमुळे (Pimpri) डीपी बॉक्‍सला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तपोवन मंदीर रोड, पिंपरी येथे घडली.

Pimpri : ‘फेस्टिव्हल ऑफ स्टार्टअप’मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अरुण कल्ले यांनी अग्निशामक दलास वर्दी दिली की, पिंपरीतील तपोवन मंदिर रोड येथील औंदुबर सोसायटीजवळ डीपी बॉक्‍सला आग लागली आहे. माहिती मिळताच संत तुकाराम नगर, पिंपरी येथील अग्निशमन (Pimpri) मुख्यालयातून एक बंब घटनास्थळी रवाना झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.