Pimpri Crime News : धक्कादायक ! पुरावा नष्ट करण्यासाठी स्त्री अर्भक टाकले लेडीज टॉयलेटमध्ये

एमपीसी न्यूज – पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एका महिलेने स्त्री अर्भक रूग्णालयाच्या लेडीज टॉयलेटमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वायसीएम रूग्णालयात शुक्रवारी (दि.18) दुपारी दिडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर तुकारम शिर्कै (वय 33, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात महिलेने स्त्री अर्भक वायसीएम रूग्णालयाच्या लेडीज टॉयलेटमध्ये टाकले. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.