Pimpri : सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याच्या वादातून परस्परविरोधी तक्रार; भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भाजपच्या पदाधिकारी महिलेने मारहाण केली तर त्यांच्या पतीने एका महिलेचा विनयभंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे घडली. याच्या परस्पर विरोधात पदाधिकारी महिलेने मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत 27 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 9) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिला भाजप पदाधिकाऱ्यासह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या महिला पदाधिकारी या आपल्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवत होत्या. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमे-याचे तोंड शेजारच्या घराकडे केले. त्या शेजाऱ्याने आक्षेप घेतला. या कारणावरून झालेल्या भांडणात भाजप महिला पदाधिकाऱ्याने फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करीत ठिकठिकाणी ओरखडले. तर भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीने महिलेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांची आई, बहिण यांना त्या पदाधिकारी महिलेने काठीने मारहाण केली. फिर्यादी यांच्या वडिलांना पदाधिकाऱ्याच्या सासऱ्याने मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.
तर या घटनेच्या परस्पर विरोधी महिला भाजप पदाधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी पाइपने मारहाण करीत फिर्यादी भाजप पदाधिकाऱ्या चारित्र्याबाबत अश्‍लील शब्द वापरले. तसेच आरोपी हातोडी घेऊन माहरण करण्यास धावून आले. दोन दिवसात तुम्हाला कापून टाकतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like