Pimpri : समाजोपयोगी तंत्रज्ञानाची निर्मिती करा- प्रशांत लोखंडे

एमपीसी न्यूज- आजच्या यांत्रिक युगामुळे मानवी जीवन सुसह्य झाले आहे. नव्या उपकरणांमुळे मानवी कक्षात नसलेल्या गोष्टी आज सहज शक्य होत आहे. अभियांत्रिकीचे विद्यार्थी म्हणून तुम्ही जे काही उपकरण बनवाल ते समाजोपयोगी असावे या दृष्टीने त्यांची निर्मिती करावी असे आवाहन, पिलाई अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई डॉ. प्रशांत लोखंडे यांनी केले.

डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्पुटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ कॉड कॉप्टर’ या विषयावर दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन 24 आणि 25 जानेवारीला करण्यात आले होते. या कार्यशाळेलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते.  या प्रसंगी प्राचार्य डॉ. अभय पवार, उपप्राचार्य डॉ.प्रकाश पाटील, निबंधक अशोक पाटील, संगणक विभाग प्रमुख डॉ. मिनिनाथ निघोट, आय टी विभाग प्रमुख डॉ अनुपकुमार बोंगाले तसेच विद्यालयातील इतर विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

डॉ. अभय पवार म्हणाले, “तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार होत आहे. रोज नव्या गोष्टी नवे उपकरण आज उदयास येत आहे. या उपकरणांमुळे मानवी जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गुन्हेगारांना शोधण्यासाठी याचा वापर केला जात आहे.

डॉ.प्रकाश पाटील म्हणाले, “आज भारत वेगाने प्रगती करत आहे. यासाठी तंत्रज्ञान महत्वाचे ठरत आहे. त्यानुसार स्वतःला काळानुसार बदलून अशा तंत्रज्ञान निर्मितीची अपेक्षा तुमच्याकडून आहे.

डॉ. मिनिनाथ निघोट म्हणाले, ” आज मानव विरहित विमानांचा झपाट्याने विकास झाला आहे. ड्रोनचा वापर फोटोग्राफी, विडिओ पुरता मर्यादित राहिला नाही, भविष्यात यात अनेक आमूलाग्र बदल होणार आहेत, त्यामुळे नवीन संशोधनास विद्यार्थ्यांनी तयार रहावे”

प्रा. धनश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व डॉ.अनुपकुमार बोंगाले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे संस्थापक पद्मश्री डी. वाय. पाटील आणि विजय पाटील, संचालक रमेश वासप्पनवरा यांचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी भवनराव गायकवाड यांचे सहकार्य मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.