Pimpri : महावितरणमधील अनधिकृतपणे बदल्यांप्रकरणी कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे प्रादेशिक कार्यालयातील शशिकांत आर. पोफळीकर यांनी अनधिकृतपणे बदली व इतर आदेश काढल्याचे महावितरणच्या मुख्य चौकशी अधिका-यांच्या तपासणीमध्ये सिद्ध झाल्याचा दावा करत त्यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती, पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक यांच्याकडे केली आहे.

महावितरणचे मुख्य चौकशी अधिकारी पराडकर आणि त्यांचे सहकारी वाडकर यांनी महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामध्ये धाड टाकली. त्यामध्ये पुणे प्रादेशिक कार्यालयामधील व्यवस्थापक शशिकांत आर. पोफळकर यांनी वरिष्ठ अधिका-यांची मान्यता न घेताच अधिकारी व कर्मचा-यांच्या अनधिकृतपणे बदल्या केल्या. तसेच त्या बदल्यांचे आदेश कंपनीच्या महावितरण वेबसाईट (पोर्टल) वर न टाकता स्वत:च्या वैयक्‍तिक मेलवरून संबंधित अधिका-यांना पाठविल्याचे सिद्ध झाले आहे. ही बाब महावितरणच्या सेवाविनियमनुसार अतिशय गंभीर प्रकारचे गैरकृत्य आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

यातील अनियमितता टाळण्याकरिता पोफळीकर यांचा कक्ष सील केला गेला. परंतु पोफळीकर यांच्याकडून संभाव्य अनियमितता टाळण्याकरिता महावितरण सेवाविनियमच्या कलम 88 (क) नुसार पोफळीकर यांना तात्काळ निलंबित करणे आवश्‍यक आहे, असे सौदाणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.