Pimpri: महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांची ‘फोन’ची अॅलर्जी संपेचिना!

एमपीसी न्यूज – विविध कारणांवरुन सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची ‘फोन’ स्वीकरण्याची ‘अॅलर्जी’ काही केल्या जात नाही. यापूर्वी नगरसेवकांचे फोन न स्वीकराल्यावरुन आयुक्तांनी समज दिली होती. आता पुन्हा त्यांना समज देण्याची वेळ आली आहे. पाठीमागे शिक्षण समितीत दोनवेळा आणि महासभेत एकदा त्यांच्या बदलीचा ठराव केला. पण, राज्यातील भाजपचा बडा नेता त्यांच्या पाठीशी असल्याने तो मंजूर झाला नाही. आता सरकार बदलले असल्याने त्यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे.

शिक्षण विभागाच्या पहिल्या प्रशासन अधिकारी म्हणून ज्योत्स्ना शिंदे यांची पिंपरी महापालिकेत 24 मे 2018 रोजी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली. तेव्हापासून विविध कारणांवरुन त्या वादग्रस्त ठरत आहेत.  त्यांच्या कार्यपद्धतीविषयी प्रचंड तक्रारी आहेत. नगरसेवक सातत्याने त्यांच्या कार्यपद्धतीविषयी आक्षेप घेत आहेत. त्यांच्या कामावर नाखुष आहेत. शिंदे यांचे शिक्षण विभागापेक्षा बाकीच्या कामात अधिक लक्ष असते. नगरसेवकांचे देखील फोन उचलत नसल्याच्या तक्रारी केल्या जातात. महासभेत देखील यावर अनेकदा चर्चा झाली आहे. त्यांची आजपर्यंतची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे.

शिक्षण विभागावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची असून त्या नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यांच्या कामकाजाबाबत नगरसेवक, नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्या जबाबदारी पार पाडण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे महापालिकेची समाजात प्रतिमा मलिन होत आहे. यामळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या नक्कीच कमी होणार आहे. महापालिकेची प्रतिमा खराब होत असल्याने शिंदे यांना राज्यसेवेत पाठविण्याबाबतचा ठरवा दोनेवळा शिक्षण समितीत आणि एकवेळा महासभेत केला होता. परंतु, राज्यातील भाजपचा एक बडा नेता त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे मागे त्यांची बदली झाली नव्हती. आता राज्यातील सरकार बदलले आहे. त्यामुळे शिंदे यांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.