Pimpri : पोलीस प्रशासनाची लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. देशाची राजधानी चालविण्यासाठी लोकांचा प्रतिनिधी नि:ष्पक्षपणे निवडण्यासाठी सर्व विभागांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शिरुर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचा काही भाग येत आहे. आयुक्तालयातर्फे निवडणूक काळात नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी निवडणूक केंद्रे आणि त्याच्या परिसराची पोलिसांकडून पाहणी केली जात आहे.

मावळ, शिरूर हा लोकसभा मतदारसंघासह पुणे मतदार संघातील बावधन आणि दिघी परिसरातील काही भाग हा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत येत असल्याने आयुक्तालयाच्या वतीने या परिसरात पाहणी सुरु आहे. त्यानुसार अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रे यांची यादी काढण्यात येत आहे. यासंदर्भातील सर्व माहिती निवडणूक विभागाला देण्याचे काम सध्या सुरु आहे.

  • संबंधीत परिसराची पहाणी झाल्यानंतर तेथे आवश्‍यक सुरक्षायंत्रणा बाबतही नियोजन हे दोन्ही परिमंडळच्या उपायुक्तांमार्फत सुरु आहे. मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता व निडणूक वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर प्रचार, निवडणूका व निकाल यावेळेत शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीस यंत्रणा आत्तापासूनच कामाला लागली आहे.

सर्वेक्षण, माहिती गोळा करणे याबरोबरच परिसरात असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना तडीपार करणे, मोका लावणे, त्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवणे अशा कारवाईंनाही वेग आला आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मीतीनंतर ही आयुक्तालयाच्या हद्दीतील पहिली सार्वत्रीक निवडणूक असेल. यावेळी आयुक्तालयाला मनुष्यबळ व वाहने यांच्या कमतरतेचा विषय येवू शकतो. मात्र यावेळी इतर राज्य किंवा राखीव दलाचा आधार पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.