Pimpri : नूतन अभियांत्रिकीमध्ये अभियंता दिन साजरा

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित नूतन अभियांत्रिकीमध्ये अभियंता दिन साजरा झाला. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

सुमारे नऊशे पन्नास विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला तर पस्तीस विद्यार्थ्यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची महती सांगण्यासाठी वक्तृत्त्व स्पर्धेत सहभाग घेतला. विविध विभागांमध्ये तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षाचा अभियंता दिन व्यासपीठीय कार्यक्रमांना बगल देऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देणारा ठरावा अशा पद्धतीने आयोजन केल्यामुळे सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कौशल्यांचा वापर करून आपला सहभाग नोंदवला, अशी माहिती विद्यार्थी विकसन अधिकारी प्रा.विजय नवले यांनी दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, प्रा. नितीन धवस, प्रा. श्रीधर लिमये, प्रा. रामदास बिरादार, प्रा. नीता कराडकर या प्रसंगी उपस्थित होते. प्रा. गायत्री बोकाडे, प्रा. शेखर रहाणे, प्रा. बाळासो कसूरे, प्रा. गुरुप्रीत भट्टी, प्रा. कल्पना कदम यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.