Pimpri: शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी गजानन चिंचवडे

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी गजानन चिंचवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक म्हणून चिंचवडे ओळखले जातात.

चिंचवडे यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे या शिवसेनेच्या चिन्हावर चिंचवडगातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांची ही दुसरी टर्म असून त्या शिक्षण समितीच्या सदस्या देखील आहेत. गजानन चिंचवडे हे पाच वर्ष शिक्षण मंडळाचे सदस्य होते. संघटन कौशल्य, मितभाषी अशी त्यांची वैशिष्टये आहेत. मावळचे जिल्हाप्रमुख म्हणून गजानन चिंचवडे यांच्याकडे पिंपरी-चिंचवड, मावळ या क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक म्हणून गजानन चिंचवडे यांची ओळख आहे. आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने कामकाज करण्यास खासदार बारणे यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी आपले कट्टर समर्थक चिंचवडे यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावून घेतली आहे. तर, यापूर्वीच पिंपरी-चिंचवडच्या शहरप्रमुखपदी दुसरे समर्थक योगेश बाबर यांची वर्णी लावून घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.