Pimpri : राष्ट्रवादीतर्फे शहरातील सार्वजनिक मंडळे, सोसायट्यांसाठी गणेशोत्सव स्पर्धा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Pimpri) पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने या वर्षीपासून शहरातील मंडळे, सोसायट्यांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023चे आयोजन करण्यात आले आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी ही माहिती दिली.

प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 75 हजार, तृतीय क्रमांकास 50 हजार तर उत्तेजनार्थ विजेत्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी नियम व अटी असतील. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव करणारी मंडळे संस्था गृहरचना सोसायटी, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील असावे. मंडळ / संस्था / सोसायटी त्या त्या विभागात नोंदणीकृत असावेत. सहभागी मंडळ / संस्था/ सोसायटी यांनी शासकिय नियम पालन केलेले असावेत. पंचानी दिलेला निकाल हा अंतिम असेल.

स्पर्धेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2023 असेल. अर्ज मिळण्याचे व भरून देण्याचे ठिकाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, पिंपरी असून अर्जासाठी 500 रुपये इतके शुल्क असेल. जास्तीत-जास्त मंडळे, संस्था, गृहनिर्माण सोसायट्यांनी या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी विनायक रणसुभे यांच्याशी 9922501586, 9890139996 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन (Pimpri) करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.