Pimpri : पिंपरीच्या गौरव चौधरीची युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिभावंत, अभ्यासू चेहरा म्हणून ओळख (Pimpri) असलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदावर कार्यरत असलेल्या गौरव चौधरी याची भारतीय युवा काँग्रेसच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्ट राष्ट्रीय प्रवक्ते पदी आणि गोवा राज्याच्या ‘यंग इंडिया के बोल सीजन 4’ च्या प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे. भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांनी नुकतेच चौधरी यांना पत्र देऊन सन्मानित केले.

भारतीय युवा काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ हा उपक्रम जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येतो. या उपक्रमातून उत्कृष्ट सादरीकरण आणि वकृत्व सिद्ध करणाऱ्यांची प्रवक्ता आणि इतर पदांवर निवड केली जाते. यामध्ये विशेष प्राविण्य मिळवले. सखोल अभ्यास, उत्कृष्ट वक्तृत्व यामुळे जिल्हा व राज्य स्तरावर गौरव चौधरींनी प्रथम क्रमांक मिळवला.

Shirur : रांजणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

तसेच, बेंगलोर येथे झालेल्या युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अतिशय चांगले आणि प्रभावीपणे आपले मुद्दे मांडून भाषण (Pimpri) केले. याची दखल घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी गौरव चौधरी यांची भारतीय युवक काँग्रेसच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्ट (राष्ट्रीय प्रवक्ता) पदी निवड केली. तसेच ‘यंग इंडिया के बोल सीजन 4’ साठी गोवा राज्याच्या प्रभारी पदी निवड जाहीर केली आहे.

गौरव चौधरी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसमध्ये यापूर्वी शहर सरचिटणीस आणि युवा प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे. राज्यस्तरावर पोलिसांची संघटना, डोंबारी समाजाचे पुनर्वसन, फार्मासिस्ट यांचे प्रश्न अशा प्रश्नांवर संघटन उभारून काम करीत आहेत. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.